Wednesday, 12 November 2025

संगमनेरात २ लाख रुपये किंमतीचे गोमंश पकडले! ८ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त

 



संजय साबळे/संगमनेर प्रतिनिधी

: नगरचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक आणि संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने टाकलेल्या छाप्यात   दोन लाख रुपये किंमतीचे १००० किलो गोमांस आणि गोमांस वाहतूक करणारा छोटा हत्ती आणि झायलो कार असा आठ लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाई दरम्यान एक आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला असून  एकाला पोलिसांनी अटक केली

          काल मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास जोर्वे नाका परिसरात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या व संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला. यावेळी या पथकाला छोटा हत्ती (क्रमांक एम.एच ४३ ए.डी २२६२ ) या मध्ये एक लाख वीस हजार रुपये किमतीचे ६०० किलो गोमांस आढळून आले. तसेच झायलो कार (क्रमांक एम.एच ४४ ०८३४) हिच्यामध्ये ८० हजार रुपये किंमतीचे ४०० किलो गोमांस असे एकूण दोन लाख रुपये किंमतीचे १००० किलो गोमांसासह गोमांस भरलेला तीन लाख रुपये किंमतीचा पिवळसर रंगाचा छोटा हत्ती आणि तीन लाख पन्नास हजार रुपये किंमतीची लाल रंगाची महिंद्रा झायलो असा आठ लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

. या कारवाईचा सुगावा लागताच बुंदी उर्फ मुददसर करीम कुरेशी हा पळून जाण्यात यशस्वी झाला असला तरी त्याचा साथीदार सलमान नजीर शेख रा.नाईकवाडपुरा, संगमनेर याच्या मुसक्या आवळण्यात या पथकाला यश आले.
या प्रकरणी शहर पोलिसात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पो.ना सचिन दत्तात्रय आडबल यांनी फिर्याद दिल्यावरून राज्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करण्याची मनाई असताना ही गोवंश जातीचे जिवंत जनावरे डांबून ठेवून त्यांना अमानुषपणे वागवून बिना चारा व पाण्याचे ताब्यात ठेवून त्यांची कत्तल करून गोंमासाची वाहतूक करताना मिळून आल्यावरून सलमान नजीर शेख  रा.नाईकवाडपुरा, संगमनेर आणि बुंदी उर्फ मुददसर करीम कुरेशी रा.भारत नगर, संगमनेर या दोघा विरुद्ध गुन्हा रजि. नंबर १०२९/ २०२२ भा.द.वि कलम २६९, ३४ महाराष्ट्र पशु संरक्षण (सुधारणा) अधिनियम सन १९९५ चे कलम ५(क),९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे गोमांस  बाबत अनेक आंदोलने गुन्हे दाखल होत असताना  खुलेआम  गोमांस ची तस्करी  संगमनेरा होत  आहे याबाबत नागरिकांत   आश्चर्य व्यक्त होत आहे

गौतमी पाटील नेवाशा तालुक्यात येणार!



नेवासा- श्री खंडोबा देवस्थान यात्रा निमित्ताने महालक्ष्मीहिवरे गावचे यात्रा कमिटीचे वतीने  दि. 12/12/2023 ते 19/12/2023 रोजी पर्यंत  विविध  करमणूक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

1) दि. 14/12/2023 ते 18/12/2023 रोजी रात्री 8  वा ते 10. वा पर्यत देवाचा छबीना

2) दि. 15/12/2023 रोजी    रात्री  8 वाजता चैञाली पाटील यांचा आर्केस्ट्रा

3) दि. 16/12/2023 रोजी रात्री 8 वा  कोमल पाटोळे यांचा आर्केस्ट्रा

4) दि. 17/12/2023 रोजी रात्री 8 वाजता गौतमी पाटील यांचा आर्केस्ट्रा

5) दि. 18/12/2023 रोजी रात्री  सविता राणी पुणेकर यांचा तमाशा  महालक्ष्मीहिवरे ता. नेवासा येथे  दिनांक 14/12/2023 ते 18/12/203 रोजी पर्यत होणाऱ्या खंडोबा यात्रा  यात्रा उत्सवाचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन  यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे

स्टार प्रवाह दूरचित्रवाहिनी कलाकार संजय पाटील यांनी घेतली मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट

12/11/2025


संगमनेर ( प्रतिनिधी ) स्टार प्रवाह या दूरचित्रवाहिनी वरील अत्यंत लोकप्रिय असलेली सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील अभिनेता संजय पाटील व त्यांची पत्नी लेखिका अबोली गोखले यांनी आज मा महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांची सदिच्छा भेट घेऊन चित्रपट मनोरंजन साहित्य या विविध विषयांवर चर्चा केली.

शिवाजीनगर सुदर्शन सिने अभिनेते व संगमनेरचे जावई संजय पाटील व त्यांची पत्नी अबोली गोखले यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. यावेळी समवेत आमदार सत्यजित तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, आनंद गोखले, गणेश गुंजाळ आदींसह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

सुख म्हणजे नक्की काय असतं ही स्टार प्रवाह वरील मालिका घराघरात पोचली असून अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. यामधील संजय पाटील यांची भूमिका ही मध्यवर्ती असून त्यांच्या पत्नी अबोली गोखले या लेखिका आहेत. नवीन नगर रोड येथील रहिवासी इंजिनीयर आनंद गोखले यांच्या त्या कन्या असून संजय पाटील हे संगमनेरचे जावई आहेत.


यावेळी त्यांनी चिरंजीव हे महारथी कर्ण यांच्या जीवनावर आधारित असलेले अबोली आनंद लिखित हे पुस्तक माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सतीश तांबे यांना भेट दिली याचबरोबर चित्रपट मालिका आणि साहित्य या विषयावर सविस्तर चर्चा केली.

यावेळी अभिनेते संजय पाटील म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांचा समृद्ध वारसा लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी जोपासला आहे. साहित्य, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार, समाजकारण,कृषी, ग्रामीण विकास या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. संगमनेर शहर व तालुका हा विकसित आणि वैभवशाली आहे. तो माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळे. महाराष्ट्रात अनेक शहरे फिरण्याचा योग येतो. परंतु इतके भव्य दिव्य अद्यावत बस स्थानक, वैभवशाली इमारती,शांतता सुव्यवस्था असलेले शहर म्हणून संगमनेरचे पहिले नाव येते. अथक परिश्रमातून केलेले हे काम आहे. विकासाबरोबर साहित्य संस्कृतीला आणि कलाक्षेत्रालाही लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कायम प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या प्रती अनेक कलाकारांना मोठा आदर आहे. त्यांच्या समवेत भेट जीवनातील आनंदाचा ठेवा असल्याचे ते म्हणाले.


तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, मराठी मालिका आणि चित्रपटांमधून अनेक निवेदित कलाकार अत्यंत दर्जेदार भूमिका करत आहेत. संदीप पाटील हे संगमनेरचे जावई असल्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. महारथी कर्ण हा मोठा विषय आहे. शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय कादंबरी नंतर कारणावरती अबोली गोखले या संगमनेरच्या कन्येने लिहिलेले चिरंजीव हे पुस्तक नक्कीच सर्वांसाठी वाचनीय ठरणारे आहे.

तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका घराघरात पोहोचली आहे आणि त्याचे सर्व श्रेय संदीप पाटील व त्यांच्या टीमला आहे. यावेळी संगमनेर मधील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, 24 December 2022

ग्रामपंचायतच्या विजयी मिरवणुकांवर बंदी घालता मग अवैध धंद्यांबाबतीत उदासिनता का? -अविनाश पवार मनसे नते



-पारनेर  पोलिस प्रशासनाने पारनेरच्या  शांततेच्या दृष्टीने सिंघम स्टाईल  घेतलेल्या खमक्या   निर्णयाचे नक्कीच १००% स्वागत पण असाच निर्णय पारनेर तालुक्यातील महिला भगिनी सुरक्षिततेच्या दृष्टीने , अवैद्य धंदे,हप्ते खोरी  व राजकीय गुंड प्रवृत्तीच्या लोकांना  सरळ करण्यासाठी सिंघम स्टाईल घेतला तर नक्कीच अभिमानाने  जाहीर स्वागत करू
(- मनसे नेते अविनाश पवार)

पारनेर:-पारनेर तालुक्यात पोलिस प्रशासनासह महसूल प्रशासनाने ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पुर्णपणे शांततेत होईल व कुठे  ही गालबोट लागणार नाही याची जशी दक्षता घेतली हे कामं नक्कीच आदर्शवत आहे तसेच  ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर  राजकीय  शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये गाजा वाजा करत  विजयी मिरवणुका न काढता  शांततेच्या मार्गाने रहान्यासंदर्भात  पोलिस प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे १००%स्वागत आहे पण हाच निर्णय पारनेर तालुक्यातील आम जनतेसाठी महिला भगिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व अवैध धंदे बंद करण्यासाठी सुद्धा घ्यायला हवा.पारनेर तालुक्यातील जनता नक्कीच प्रशासनाचे जाहीर  स्वागत करेल. आज पारनेर तालुक्यात चालु असलेल्या हप्ते खोरी,गुंडगिरी मुळे पारनेर तालुक्यातील सुपा एम आय डिसी मधील कंपन्या, उद्योग स्थलांतरित झाले आहेत हे सुद्धा गांभीर्याने घेणं गरजेचं आहे.असे मनसे नेते अविनाश पवार यांनी म्हटले आहे

Sunday, 18 December 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अहमदनगर जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या उद्घाटनाचे आमंत्रण




शिर्डी, १८ डिसेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना
जिल्ह्यातील व शिर्डी येथील विविध प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी राज्याचे
महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी
आमंत्रण ‍दिले आहे. पंतप्रधानाच्या शिर्डी येथील संभाव्य दौऱ्याच्या
पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी आज श्री.साईबाबा शैक्षणिक संकुलाच्या नवीन
इमारतीची पाहणी केली. विविध विकासकामांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी
नवी दिल्ली येथे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्यासोबत भेट घेतली.
त्यावेळी त्यांनी उत्तर अहमदनगर जिल्ह्याच्या जिरायती भागाला वरदान
ठरणाऱ्या निळवंडे धरण लोकार्पण, शिर्डी साईबाबा विश्वस्त व्यवस्थापन
समितीने भाविकांच्या दर्शनासाठी नव्याने निर्माण केलेली दर्शन रांग व
श्री.साईबाबा शैक्षणिक संकुलाच्या नवीन इमारतीचे उद्घाटनास येण्याचे
आमंत्रण दिले. या आमंत्रणास पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे‌.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी शिर्डी येथे पाहणी दौरा केला.

श्री‌. साईबाबा शैक्षणिक संकुलाच्या नवीन इमारतीची पाहणीवेळी श्री.
साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव, प्रांताधिकारी
गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित
होते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आवश्यक शैक्षणिक सुविधा, शेती
महामंडळाच्या जागेवर खेळण्यासाठी अद्यावत मैदान उभारण्यात यावे, शैक्षणिक
संकुलातील मोकळ्या जागेत सौंदर्यस्थळे विकसित करून सुशोभीकरण करण्यात
यावे, शैक्षणिक संकुलाकडे येणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे अशा
सूचना पालकमंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
श्री.साईबाबा समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मंदीर सभागृहात त्यांनी
पत्रकारांशी विविध विषयावर चर्चा केली. त्यावेळी महसूलमंत्री श्री.विखे
पाटील म्हणाले, शिर्डी संस्थान द्वारे १०९ कोटी रुपयांच्या निधीतून
विकसित करण्यात आलेले दर्शन रांगेचे १२ हॉल आणि २१८ कोटी रुपयांच्या
निधीतून विकसित करण्यात आलेल्या एज्युकेशन कॉम्प्लेक्सच्या उद्घाटनासाठी
तसेच उत्तर अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले
निळवंडे धरण, शिर्डी विमानतळ येथील नवीन टर्मिनल बिल्डिंग व शेतकरी
परिषदेस शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे अशा विविध प्रस्तावित
कार्यक्रमांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण देण्यात आले आहे.
यास आमंत्रणाचा त्यांनी स्विकार केला आहे. फेब्रुवारी किंवा मार्च २०२३
मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिर्डी भेट प्रस्तावित आहे.
त्यादृष्टीने शिर्डीतील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात येत आहे.

श्री.साईबाबा शैक्षणिक संकुलात केंब्रिज विद्यापीठाच्या धर्तीवर सुविधा
विकसित करण्यात याव्यात. देशांतर्गंत उच्च शैक्षणिक सुविधा असलेल्या
शैक्षणिक संकुलाची पाहणी करून त्या धर्तीवर याठिकाणी सुविधा असाव्यात.
तसेच विद्यार्थ्यांसाठी शेती महामंडळाच्या जागेवर सर्व सोयी-सुविधांसह
सुसज्ज मैदान उभारण्यात यावे. त्यासाठी प्रस्ताव तयार करावा. अशा सूचना
ही पालकमंत्र्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

येत्या काळात शिर्डीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे २ प्रकल्प उभारण्याचा
मानस आहे. आयटी पार्क, लॉजीस्टीक हब, आनंदसागरच्या धर्तीवर थीम पॉर्क
उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. जेणेकरून शिर्डी येथे दर्शनासाठी
येणाऱ्या भाविकाच्या करमणुकीची सोय होईल. त्यामुळे भाविक याठिकाणी एक
दिवस मुक्काम करेल. यातून शिर्डीच्या अर्थकारणाला गती मिळेल. वाहतूक
कोंडीची समस्या सोडविण्यासाठी वाहतूक आरखडा तयार करण्यात येईल. ‘नो
व्हेईकल झोन’ विकसित करण्यात येईल. असे ही पालकमंत्री श्री.विखे पाटील
यांनी यावेळी सांगितले.